Ad will apear here
Next
‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात
पुणे : जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे पंधरावे जागतिक संमेलन एक ते तीन जानेवारी २०१८ या कालावधीत पुणे येथे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलिया येथील अभियंते आणि ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलेले डॉ. विजय जोशी भूषवणार आहेत.

उद्योग क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण करून सुमारे ७० हजार जणांना रोजगार मिळवून देणारे भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापंक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ‘जगभरात विखुरलेल्या आणि उद्योग, व्यवसाय, विज्ञान, स्थापत्य, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तींना या संमेलनाच्या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे,’ अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर यांनी दिली.

संमेलनाच्या स्थळाची घोषणा लवकरच करण्यात येणार असून संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक हे संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.

१९९४ साली स्थापण्यात आलेल्या जागतिक मराठी अकादमीतर्फे २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक संमेलन भरवण्यात येत आहे. यावर्षी या संमेलनात युरोप, अमेरिका, मध्य अफ्रिका आणि आशिया खंडातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मराठी बांधव या सहभागी होणार असल्याचे फुटाणे आणि ईटकर यांनी सांगितले.
 
उद्घाटनाविषयी :
दिवस : एक जानेवारी २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZVUBI
Similar Posts
शरद पवारांची मुलाखत घेणार राज ठाकरे पुणे : ‘जागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यात होणाऱ्या १५व्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनात शेवटच्या दिवशी विशेष आकर्षण असणार आहे ते ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांची ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत.
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला
पुणे येथे लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुणे : ‘अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे महाअधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात होणाऱ्या उद्योजकता संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी यांनी दिली
‘धनिकांनी समाजहितासाठी पैसे खर्च करण्याची गरज’ पुणे : ‘समाजातील धनिक लोकांनी समाजहिताच्या कामासाठी पैसे खर्च केले पाहिजेत. मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी ‘सीएसआर’अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन नवजात अर्भकांसाठी दोन अतिदक्षता विभाग उभारून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. इतर धनिकांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language